सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ऐश्वर्याच्या लेकीचा डान्स


नुकतीच ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल’मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्याच्याही निरागस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले. आपल्या लाडक्या लेकीचे फोटो व्हिडिओ ऐश्वर्या आणि अभिषेक नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण आराध्याच्या सोशल मीडियावरील एका व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.


तुम्हाला रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘मेरे गली मे’ हे गाणे तर आठवतच असेल. आराध्या आणि तिच्या बालमित्र-मैत्रिणींनी याच गाण्यावर धमाल डान्स केला आहे. तिने ‘समर फंक २०१९’ या कार्यक्रमात या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. बॉलिवूड कलाकारांसह चाहतेही तिच्या या डान्सचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर आराध्याचा हा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकनेही आराध्याचा डान्स पाहण्यासाठी हजेरी लावली होती. या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

Leave a Comment