या फोटोमागे दडले आहे वेगळेच सत्य !


आपल्याकडे एक दिसते तसे नसते अशी एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीला अनुसरुन सध्या सोशल मीडियात एक प्रकरण व्हायरल होत आहे. सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो एका लग्नाचे असून एक लहान मुलगा ज्यात त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीसोबत लग्न करत आहे आणि वेडींग किसही दोघांनी केल्यानंतर चर्चा सुरू झाली की, एका अरेंन्ज मॅरेजचे हे फोटो आहेत आणि प्रकरण बालविवाह व चाइल्ड ट्रॅफिकींगचे आहे. पण या फोटो मागचे सत्य जेव्हा समोर आले तेव्हा सर्वजण भावूक झाले आहेत.

मेक्सिकोमधील ही घटना असून यासंदर्भात स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, हे फोटो लग्नातील आहेत. पण हे प्रकरण बालविवाह किंवा चाइल्ड ट्रॅफिकींगचे नसून भलेही फोटो दिसत असलेला नवरदेव तुम्हाला १० वर्षांचा लहान मुलगा वाटत असेल, पण त्याचे मुळात वय १९ वर्ष आहे. एका डिसऑर्डरने तो पीडित आहे. या तरूणाचे नाव जोनाथन असे असून मेक्सिकोच्या एका शहरात तो राहणारा आहे. जोनाथनच्या शरीराचा विकास आजारामुळे हळुवार होत आहे. तो त्यामुळेच त्याच्या वयापेक्षा लहान वाटतो.

जरी असे असले तरी त्याच्याच वयाच्या मुलीकडून जोनाथनला प्रेम मिळाले. नुकतेच त्याच्या प्रेयसीसोबत त्याने लग्न केले. हा लग्नसोहळा परिवारातील लोक आणि मित्रांच्या उपस्थित पार पडला. ४ मे रोजी त्याचे लग्न झाले. Esto Es Guerrero नावाच्या फेसबुक पेजवर दुसऱ्या दिवशी त्याचे फोटो समोर आले. जोनाथनच्या समस्येचा सविस्तर उल्लेख या पेजवर केला आहे. पण केवळ त्याचे फोटो व्हायरल झाले, त्याच्याबद्दल माहिती कुणी वाचली नाही. आणि लोक वेगवेगळे अर्थ काढू लागले. अर्थात जोनाथनचे हे अरेन्ज मॅरेज नसून त्याने लव्ह मॅरेज केले आहे. जोनाथन यावर म्हणाला की, मला प्रेम आणि मला आनंद आहे की, माझी सर्वात चांगली मैत्रिण माझी जीवनसाथी झाली.

Leave a Comment