एमबीए पत्नीने इंजीनिअर पतीने डोक्यावर शेंडी ठेवली म्हणून दाखल केला घटस्फोटाचा अर्ज


भोपाळ – आपल्या डोक्यावरील शेंडीमुळे एका ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तीला वैवाहिक आयुष्यात कलहाचा सामना करावा लागला. कुटुंबातील वाद एवढा वाढला की, पती-पत्नी आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत पत्नी म्हणाली की, डोक्यावर पतीने शेंडी ठेवल्यामुळे गावंढळ दिसतो. माझ्या माहेरचे त्याच्यामुळे माझी खिल्ली उडवतात, ज्यामुळे मला खूप अपमानजनक वाटते. पण पतीचे म्हणने आहे की, त्याने नवस मागितला असून त्याच्या मृत्यूनंतरच ही शेंडी जाईल.

कौटुंबिक न्यायालयाने प्रकरणाला समोपदेशासाठी ठेवले आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर अरेरा कॉलोनीतील एका महिलेने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. न्यायालया यावेळी कळाले की, त्यांच्यातील वादाचे कारण पतीने ठेवलेली शेंडी आहे. पत्नीचे म्हणने आहे की, शेंडी ठेवल्यामुळे पती गावंढळ दिसतो. तिच्या स्टँडर्डचे नाही. पती एक्जीक्यूटिव इंजीनिअर आहे तर पत्नी एमबीए पास आहे.

समुपदेशक सरिता राजानीने सांगितले की, 2 फेब्रुवारी 2016 ला त्यांचे लग्न झाले होते. सगळे काही पहिल्या वर्षी सुरळीत होते. त्या व्यक्तीच्या आई वडिलांचा दोन वर्षानंतर एका अपघातात मृत्यू झाला. मृत्यूच्या कर्मकांडावेळी पतीचे मुंडण केले गेले. त्यानंतर धार्मिक मान्यतेनुसार पतीने शेंडी ठेवली. यानंतर आयुष्य हळुहळू सुरळीत सुरू होते, पण पतीने शेंडी कापली नाही म्हणून पत्नीने त्याला बोलणे सुरू केले. पत्नीने सांगितले की, पतीने शेंडी ठेवल्यामुळे सगळे त्यांना पंडीतजी म्हणून हाक मारायचे आणि त्यामुळे पत्नीला अपमानजनक वाटायचे.

महिला म्हणाली की, पतीने ठरवले आहे, कधीच शेंडी कापणार नाही. त्यांची शेंडी त्यांच्या मृत्यूनंतरच जाईल. तर पती म्हणाला, पत्नीला सगळ्या सुख सोयी आहेत, पण ती त्याच्या शेंडीच्या मागे आहे. या वादामुळे पत्नी 6 महिन्यांपासून माहेरी गेली आहे. पतीचे म्हणने आहे की, शेंडीसोबत स्विकार कर किंवा घटस्फोट दे. सध्या त्यांच्यात काउंसलिंगच्या माध्यामातून वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Leave a Comment