या पठ्ठ्याने रेड स्कूलसारखा लूक मिळवण्यासाठी केले हे काम


बॉलीवूडने आपल्याला अनेक सूपरहिरो दिले आहेत पण त्यापेक्षा आपल्या मनावर हॉलीवूडच्या सूपरहिरोंचा जास्तच प्रभाव असतो. त्यातच कॅप्टन अमेरिका आणि आयर्न मॅन सारखे सूपरहिरो आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. नेहमीच हार न मानने, फोकस राहणे अशा गोष्टी ही पात्रे चाहत्यांना नकळत शिकवून जातात. अनेक चित्रपटांमधून अनेक चांगल्या गोष्टी घेता येतात आणि काही लोक घेतातही. त्यांच्या आवडत्या भूमिकेच्या अनेकजण प्रेमात पडतात. त्यांच्यासारखे दिसण्याचाही ते प्रयत्न करतात. पण त्याला पण एक मर्यादा असते. त्यातच काही लोक याबाबत जास्तच अतिरेक करतात.

व्हेनेझुएला कॉमिक बुकचा हेन्री डेमन नामक ४१ वर्षीय व्यक्ती एवढा मोठा फॅन आहे की त्याने कॅप्टन अमेरिका चित्रपटातील रेड स्कूल या खलनायकाप्रमाणे लूक करण्याचा निर्णय घेतला. डेमनने २०११ साली रिलीज झालेल्या चित्रपटानंतर व्हिलनसारखा लूक करण्याचा निर्णय घेतला आणि २०१२ मध्ये त्याने डोळ्यांवर टॅटू काढला. त्याने डोळे काळे केल्यानंतर चेहऱ्यातही पूर्ण बदल करण्याचा त्याने निर्णय घेतला.

डेमनने त्यानंतर एका मागोमाग एक सर्जरी करून घेतल्या. त्याने सर्जरीच्या माध्यमातून कपाळाचा आकार बदलल्यानंतर त्याचे नाकही चक्क त्याने कापून घेतलं. आता तो रेड स्कूलसारखा दिसतो आहे. तो पुढे आणखीही काही सर्जरी करणार आहे.

Leave a Comment