तुम्ही पाहिला आहे का शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा ट्रेलर ?


लवकरच ‘कबीर सिंह’ या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरता होती. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

शाहिद कपूर एका महत्वपूर्ण भूमिकेत ‘कबीर सिंह’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट संदीप वांगा यांच्या तेलुगू ‘अर्जून रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अर्जून रेड्डीची भूमिका विजय देवरकोंडा याने साकारली होती. त्याच्यासोबत शालिनी पांडे ही अभिनेत्री झळकली होती. ‘कबीर सिंह’ या चित्रपटात आता शाहिदसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शाहिद कपूर ‘कबीर सिंह’च्या ट्रेलरमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतो. कियारा ही त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटात कियारा आणि शाहिद भूमिका साकारत आहेत. सुरेश ओबेरॉय आणि निकीता दत्ता हे कलाकारही या चित्रपटात त्यांच्यासोबत दिसणार आहेत. २१ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment