रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये हा असणार खलनायक


दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलिवूडमध्ये अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. आत्तापर्यंत बरेच सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या अॅक्शनपटात हिरोसोबत त्याच्या चित्रपटाचे खलनायक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. आता त्याने ‘सूर्यवंशी’ चित्रपटासाठी एक दमदार खलनायक शोधला आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटात खलनायकाच्या रूपात ‘अक्स’, ‘गुलाल’ आणि ‘मॉम’ यांसारख्या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारणारा अभिमन्यू सिंह हा दिसणार आहे. सोनू सुद याने रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. आता ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अभिमन्यू सूर्यवंशीसोबत अक्षय कुमार भिडताना दिसणार आहे.

याबद्दल एका माध्यमाशी बोलताना अभिमन्यूने सांगितले, की एका तमिळ अॅक्शन चित्रपटातील भूमिका पाहून ‘सूर्यवंशी’साठी रोहितने माझी निवड केली आहे. माझी त्या चित्रपटातही नकारात्मक भूमिका होती. पण, मी त्यामध्ये हिरोचीदेखील भूमिका साकारली होती.

तो ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला, की माझी या चित्रपटातील भूमिका अत्यंत क्रुर आहे. पोलिसांविरोधात एकप्रकारची लढाईच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे’. अक्षय कुमार या चित्रपटात एटीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, कतरिना कैफ ही देखील या चित्रपटात झळकणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment