दीपिका, ऐश्वर्या, कंगना, ‘कान्’ चित्रपटमहोत्सवात सहभागी होण्यास सज्ज


दरवर्षी सिनेक्षेत्रामध्ये जागतिक कीर्ती संपादन केलेले अनेक कलाकार ‘कान्’ येथे आयोजित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येत असतात. यंदाच्या वर्षी ७२व्या ‘कान्’ चित्रपटमहोत्सवाचे आयोजन केले जात असून, यातील ‘रेड कार्पेट’ इव्हेंट मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भारतीय कलाकार सज्ज होत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, कंगना रानौत, या सिनेतारका १४-२५ मे या काळामध्ये आयोजित होत असलेल्या कान् चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. ‘मणिकर्णिका’ फेम अभिनेत्री कंगना रानौत १६-१८ मे या काळामध्ये ‘ग्रे गूज’ या व्होड्काच्या प्रसिद्ध ब्रँडची प्रतिनिधी म्हणून ‘रेड कार्पेट’ इव्हेंट मध्ये दिसणार आहे.

दीपिका पदुकोन सोळा मे रोजी ‘रेड कार्पेट’ इव्हेंटमध्ये दिसणार असून, ऐश्वर्या राय बच्चन एकोणीस मे रोजी ‘रेड कार्पेट’वर दिसणार आहे. अभिनेत्री सोनम कपूर वीस आणि एकवीस मे रोजी कान् महोत्सवामध्ये सहभागी होणार असून, दीपिका, ऐश्वर्या आणि सोनम या तीनही अभिनेत्री सुप्रसिद्ध ब्रँड ‘लोरेआल इंडिया’च्या प्रतिनिधी म्हणून ‘रेड कार्पेट’ इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या सोबत ‘बिग बॉस’ मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतामधे आलेली हीना खान ही देखील प्रथमच कान् महोत्सवामध्ये सहभागी होत आहे. तिने अभिनय केलेला लघु चित्रपट ‘लाईन्स’, या चित्रपट महोत्सवामध्ये सतरा मे रोजी प्रथमच प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment