व्हिडीओ; समुद्रामध्ये खेळले जाणारे क्रिकेट सामने


महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच आगळे वेगळे व्हिडीओ त्यांच्या अकौंटवरून शेअर करत असतात. नुकताच त्यांनी समुद्राच्या मध्ये खेळल्या जाणारया क्रिकेटचा एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकौंटवरून शेअर केला असून आयपीएल सामने संपल्यावर हा सामना बघण्यासाठी उत्सुक असल्याचे लिहिले आहे. आनंद यांना हा व्हिडीओ त्यांच्या व्हॉटसअप वंडर बॉक्स मध्ये मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या व्हिडीओ अनेकानी शेअर केला आहे.

क्रिकेटप्रेमींच्या माहितीसाठी आम्ही या समुद्रातील क्रिकेटची खास माहिती देत आहोत, न्यूझीलंडच्या समुद्रामध्ये हे बेट असून त्याचे नाव सबमरीन असे आहे. समुद्राच्या लाटांची पातळी कमी झाली की हे बेट वर येते आणि त्याच काळात येथे क्रिकेट खेळले जाते. या बेटाचा आकार पाणबुडीसारखाच असल्याने ते सबमरीन याच नावाने प्रसिद्ध आहे. येथे सबमरीन क्रिकेट क्लबची स्थापना झाली असून वर्षातून दोन वेळा येथे १-१ तासाची इनिंग असलेले सामने होतात. साधारण दिवसाच्या मध्यात हे सामने घेतले जातात आणि त्यासाठी दोन्ही टीमचे खेळाडू बोटीतून बेटावर जातात.


अर्थात सबमरीन क्रिकेट क्लब २००९ मध्ये स्थापन झाला असून त्याच्या सबमरीन ट्रॉफीसाठी हे सामने खेळले जातात. मात्र हा क्लब २००९ मध्ये सुरु झाला असला तरी समुद्रातून बाहेर येतील तेव्हा तेव्हा या बेटावर क्रिकेट खेळण्याची परंपरा जुनीच आहे. या सामान्यांना प्रेक्षकवर्ग हजेरी लावतो आणि येणाऱ्या पाहुण्यांचे येथे स्वागत केले जाते.

Leave a Comment