जरा संभाळूनच पहा रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर


एकता कपूरची रागिणी या सिरीजने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला होता. आता त्याच सिरीजमधील रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर एकता कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून रागिणी एसएमएसच्या आतापर्यंतच्या सगळ्या भागांपेक्षा हा भाग सगळ्याच जास्त हॉरर असणार असल्याचे टीझरवरून लक्षात येत आहे. त्याचबरोबर आताच्या सिरीजमध्ये पहिल्या सगळ्या भागांपेक्षा खूपच जास्त सेक्स सीनचा भडिमार करण्यात आला आहे असे टिझरवरुन लक्षात येते.

नवीन रागिणी आता दिव्या अग्रवाल बनली असून यात तिच्या नायकाच्या भूमिकेत वरुण सुद दिसणार आहे. खऱ्या आयुष्यात वरुण आणि दिव्या नात्यात आहेत. त्यांच्या अफेअरला विकास गुप्ताच्या एस ऑफ स्पेस या कार्यक्रमापासून सुरुवात झाली. ते रोडीजच्या नवीन सिझनमध्ये होस्टच्या भूमिकेत दिसत आहेत. या वेबसिरिजद्वारे दिव्या आणि वरुण हे दोघेही अभिनयक्षेत्रात पदार्पण करत असून आपल्याला त्या दोघांमध्ये रोमान्स आणि सेक्स सीन या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर दिव्या आपल्या अदांनी सनी आणि करिश्माला मागे टाकणार असे नक्कीच वाटते.

नेहमीच वरुण आणि दिव्या हे दोघे कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिले आहेत. त्या दोघांचे एक्स असलेले प्रियांक शर्मा आणि बेनाफ्सा सोनावाला यांनी बिग बॉस 11 या कार्यक्रमात भाग घेतला होता. ते दोघे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या जोडीदाराला फसवत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले होते. आता या वेबसिरिजचा नवा सिझन म्हणजेच रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही वेबसिरिज देखील अल्ट बालाजीवरच पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment