सोशल मीडियात व्हायरल होत आहेत पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो


देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार धामधूम आहे. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या गोष्टी सतत व्हायरल होत आहेत. अशातच सोशल माडियावर एका पिवळ्या साडीतील महिलेचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. रिटर्निंग ऑफिसर ही महिला असून मीडिया आणि सोशल मीडिया अशी दोन्हींकडे तिची चर्चा रंगली आहे. नलिनी सिंह असे या महिलेचे नाव असल्याचा दावा करण्यात आला आला आहे. पण तो सपशेल खोटा आहे.

या महिलेचे फोटो फेसबुकवर शेअर करत असा दावा केला जात आहे की, नलिनी सिंह असे या महिलेचे नाव असून ती ‘मिसेस जयपूर’ राहिलेली आहे. त्याचबरोबर असेही सांगण्यात आले आहे की, ईएसआयजवळ कुमावत स्कूलमध्ये मतदानावेळी त्यांची ड्युटी होती. त्याचबरोबर त्यांच्या पोलिंग बूथवर १०० टक्के मतदान झाले.

हजारो लाइक्स आणि शेअर या महिला अधिकाऱ्याच्या फोटोंना मिळाले आहेत. फेसबुकच नाही तर हॉट्सअ‍ॅपवरही हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण या फोटोंची आणि व्यक्तीची जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा समोर आले की, या महिलेचे खरे नाव नलिनी सिंह नाही.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे फोटो जयपूरचे नाही तर लखनौचे असून पत्रकार तुषार रॉय यांनी हे फोटो काढलेले आहेत. ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी ही महिला अधिकारी लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे आणि त्यांचे खरे नाव रीना द्विवेदी असे आहे.

५ मे २०१९ म्हणजे निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे व्हायरल झालेले फोटो आहेत. रीना द्विवेदी त्या दिवशी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर १७३ वर होत्या. रीना यांनी यावर सांगितले की, मी तर माझी ड्युटी करत होते. मी जेव्हा माझ्या टीमसोबत ईव्हीएम मशीन घेऊन जात होते, तेव्हा एका पत्रकाराने माझे फोटो काढले. हे फोटो व्हायरल झाले आहेत. आता तर लोक रस्त्याने जातानाही माझ्यासोबत सेल्फी घेत आहेत.

Leave a Comment