
अभिनेता ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या घवघवीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वलचे नाव ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ असे असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
व्यक्तीनुसार बदलत जाणाऱ्या प्रेमाच्या व्याख्या या टीझरमधून सांगण्यात आल्या आहेत. समलैंगिक संबंधांवर शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपट आधारित असणार आहे. अभिनेता आयुष्मान खुराणाची यात वर्णी लागली आहे. तर त्याच्या अपोझिट कोण झळकणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आयुष्मान आणि भूमी पेडणेकरची जोडी पहिल्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
टीझरसोबतच ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची समोर आली रिलीज डेट
हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २०२० मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवाल्या या करणार असून आनंद एल राय यांची निर्मिती असणार आहे.
