कंगनामुळे ऋतिकने बदलली ‘सुपर ३०’ची रिलीज डेट


बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगणा राणावत आणि हँडसम हंक ऋतिक रोशनचा वाद सर्वश्रृत आहे. पण ऋतिकने या वादात अनेकदा कंगनासमोर माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून ऋतिकचा ‘सुपर ३०’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पण सतत चित्रपटाच्या मार्गात कोणते ना कोणते अडथळे येत आहेत.

कंगना या अडथळ्यांचे मूळ कारण आहे. २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला ऋतिकचा ‘सुपर ३०’ चित्रपट येणार होता. पण ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनाची तारीख कंगनानेदेखील हीच ठरवल्यानंतर ऋतिकने माघार घेत आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली.

यानंतर ऋतिकचा ‘सुपर ३०’ चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित केला जाणार असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले. तर कंगनानेही यामागोमाग आपल्या ‘मेंटल हैं क्या’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २६ जुलै जाहीर केल्यानंतर ऋतिकने आता पुन्हा एकदा कंगनासोबत टक्कर घेणे टाळत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले आहे. प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Leave a Comment