‘भारत’मधील ‘अैथे आ’ गाणे रिलीज


सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी बहुचर्चित ‘भारत’ चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘अैथे आ’ असे शीर्षक आहे. एका लग्नात हे गाणे चित्रीत केले गेले असून याला ‘शादी वाला गाना’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. कतरिना आणि सलमानचा खास डान्स गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

निती मोहन, कमाल खान आणि अकासा सिंग यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन विशाल ददलानी आणि शेखर यांनी केले आहे. तर हे गाणे इर्शद कामिल यांनी लिहिले आहे. २ मिनीट १२ सेकंदाच्या या गाण्यातील सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या नक्कीच पंसतीस उतरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कतरिना या गाण्यात गुलाबी रंगाच्या साडीत तर सलमान काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. दरम्यान नोरा फतेही, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांच्याही चित्रपटात भूमिका असणार आहेत. हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment