‘हाऊसफुल्ल ४’मध्ये नवाजुद्दीनची एन्ट्री


‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. चित्रपटाच्या स्टारकास्टवरूनही यासोबतच पडदा उठवण्यात आला होता. या चित्रपटात आता आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची वर्णी लागली आहे.


याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. अक्षय कुमार, क्रिती सेनॉन, क्रिती खारबंदा, पुजा हेगडे, राणा दग्गुबत्ती, बॉबी देओल, रितेश देशमुख, जॉनी लिवर, चंकी पांडे, शरद केळकर आणि सौरभ शुक्लासारखी तगडी स्टारकास्ट चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान आणि फरहाद सामजी करणार आहे. तर निर्मिती साजिद नादियाडवाला यांची असणार आहे. १८० कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment