
आजही अनेकांसाठी शकुंतला देवी हे नाव अनोळखी असून लोकांपर्यंत कधी हे नाव पोहचलेच नाही. म्हणूनच आता मोठ्या पडद्यावर मानवी संगणक अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवींची कथा उलगडणार आहे. या चित्रपटाविषयी नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मानवी संगणक शकुंतला देवींच्या भूमिकेत झळकणार विद्या बालन
विद्या बालन यात शकुंतला देवींची भूमिका साकारणार आहे. आपली बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून शकुंतला देवींनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. दोन संख्या १८ जून १९८० मध्ये त्यांना गुणाकारासाठी देण्यात आल्या. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने हे आकडे निवडले होते. या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत त्यांनी केवळ २८ सेकंदांमध्ये हे उत्तर दिले.
यामुळेच मानवी संगणक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. दरम्यान अनु मेनन हे त्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला यावर्षीच सुरूवात होणार असून २०२० च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
