निर्मात्यांनी बदलली ‘अवतार-२’ची रिलीज डेट


बहुप्रतिक्षीत बहुचर्चित ‘अवतार-२’ चित्रपटाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापुर्वी हा चित्रपट डिसेंबर २०२० मध्ये रिलीज होणार होता पण हा चित्रपट आता १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


याचाच अर्थ चित्रपटाचे पुढील सर्वच भाग लांबणीवर पडणार आहेत. म्हणजेच, आता १७ डिसेंबर २०२१ ऐवजी २२ डिसेंबर २०२३ रोजी ‘अवतार-३’ रिलीज होईल आणि २०२४ ऐवजी १९ डिसेंबर २०२५ मध्ये ‘अवतार-४’ रिलीज होईल, तर चित्रपटाचा पाचवा भाग २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘अवतार २’ चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरोन करणार आहेत. चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटबद्दलची घोषणा वॉल्ट डिज्नी स्टुडिओजच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आली आहे. ‘अवतार’च्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच निराशा करणारी असणार आहे.

Leave a Comment