‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या तयारीला लागली परिणीती


नुकतीच केसरी चित्रपटातून अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या पाठोपाठ आता तिने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा चित्रपट हिंदी रिमेक असणार असून सध्या या चित्रपटासाठी परिणीती चांगलीच मेहनत घेत आहे.

परिणीती या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली, या चित्रपटासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. कारण, मी जी भूमिका या चित्रपटात साकारणार आहे, ती माझ्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जुलैमध्ये इंग्लंडला रवाना होणार असल्याचे तिने म्हटले आहे.

इंग्लंड हे माझ्यासाठी इतर वेळी फिरणे आणि सुट्टीची मजा घेण्याचे ठिकाण असते. पण माझ्यासाठी ते यावेळी एका शाळेप्रमाणे असणार आहे. हा पूर्णपणे वेगळा रोल साकारण्यासाठी आपल्याला इंग्लंडमध्ये यावेळी शाळेप्रमाणेच प्रशिक्षण घ्यावे लागणार असल्याचे परिणीतीने म्हटले आहे. दरम्यान चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झाले नसून २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिभू दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Leave a Comment