पंतप्रधान म्हणून शरद पवारांना पसंती नाही – आंबेडकर


सोलापूर : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये इतर राजकीय पक्षांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैंकी एक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी डोकेदुखी ठरली. काँग्रेस-एनसीपीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीतही वंबुआ आव्हान ठरणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भाजप विरहित सत्ता स्थापन करण्यासाठी पंतप्रधान पदासाठी मायावती यांना पाठिंबा देऊ मात्र शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी कट्टर विरोध असल्याचे स्पष्ट केलेय. सोलापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी आणि सहकारी पक्ष एआयएमआयएम महाराष्ट्रातील सर्व अर्थात २८८ मतदारसंघांमध्ये येणाऱ्या विधानसभेला आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कुणाहीसोबत आपला पक्ष जाणार नाही, पण आपल्या पक्षासोबत कुणालाही यायचे असेल तर आपल्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेच्या पाचव्या आणि सातव्या टप्प्यात मोदींना सत्ता हातातून जाते की काय, म्हणून आता निवडणुकीत मोदी वैयक्तिक टीका करत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

Leave a Comment