असे आहे ‘भीमराव – एक गौरव गाथा’ या मालिकेचे शीर्षकगीत


येत्या बौद्ध पौर्णिमेपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणाऱ्या ‘भीमराव – एक गौरव गाथा’ या मालिकेचे शीर्षकगीत आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या जोडीने तयार केले आहे. आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

(व्हिडीओ सौजन्य – Marathi Box Office)
आंबेडकरांच्या विचाराने लहानपणापासूनच प्रभावित झालेल्या या दोन्ही भावांकडे ‘भीमराव – एक गौरव गाथा’ या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा दोघांनीही या गाण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. प्रेक्षकांपर्यंत महामानवाचे विचार शीर्षकगीतातून पोहोचवणे आव्हानात्मक होते. या गाण्यावर आदर्श आणि उत्कर्षने बराच अभ्यास आणि वाचन करुन शब्द लिहिले. दोघांचीही मालिकेचे टायटल ट्रॅक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आदर्श शिंदे या नव्या अनुभवाविषयी सांगताना म्हणाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर आधारित मालिका येणे आणि त्याचे शीर्षकगीत करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी प्रवास आहे. माझ्यावर जो विश्वास स्टार प्रवाहने दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. बाबासाहेबांचे विचार या शीर्षकगीतातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि हे गाणे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवेल याची मला खात्री आहे. क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायकामोडल्या रूढी -त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायकाजीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जनाभीमराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया असे या शीर्षकगीताचे बोल आहे. आदर्श-उत्कर्षनेच या गाण्याला संगीत दिले आहे. नुकतेच आदर्शच्या भारदस्त आवाजात या गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडले. ही मालिका १८ मेपासून सुरू होत असून सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार असून बाबासाहेबांचा बालपणापासूनचा प्रवास पाहायला मिळेल.

Leave a Comment