‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ आणखी एक गाणे तुमच्या भेटीला


नुकतेच टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया अभिनीत आणि पुनित मल्होत्रा द्वारा दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ मधील नवे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे जट लुधियाने दा असे शीर्षक आहे. टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांची खास लव्हस्टोरी आणि डान्सची झलक गाण्यात पाहायला मिळत आहे.

टायगर आणि तारावर या गाण्याचा बहुतेक भाग चित्रीत केला गेला आहे. तर यात अनन्याची काही वेळाचीच झलक पाहायला मिळते. या गाण्याला विशाल ददलानी आणि पायल देव यांनी आवाज दिला आहे. तर अनविता दत्त आणि रॅप पोर्शन पैरी यांनी हे गाणे लिहिले आहे.

चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार असल्याचे या गाण्यावरुन जाणवत आहे. दरम्यान या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्यामुळे, त्यांच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट येत्या १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment