आलिया भटच्या या स्टायलिश बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क


मंगळवारी एअरपोर्टवर अभिनेत्री आलिया भट स्पॉट झाली. बेसिक फॅशनेबल लुकमध्ये ती यावेळी दिसली. तिने यावेळी व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्स घातली होती आणि यासोबतच रेड कलरची बॅग घेतली होती. सध्या सोशल ज्या बॅगची चर्चा मीडियावर होत आहे. एअरपोर्टवर Karl Lagerfeld’s कलेक्शनची ही बॅग सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. रेड कलरच्या या साइड पॅक बॅगचा लुक फारच स्टायलिस आणि हटके दिसत होता. नेहमीच बेस्ट फॅशन सेन्ससाठी आलिया बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. यावेळी एअरपोर्ट लुकसाठी कॅरी केलेल्या या बॅगची किंमत 6900 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 5 लाख रुपये एवढी आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ मध्ये टायगर श्रॉफसोबत आलिया भट नुकतीच Hook Up साँगमध्ये पोल डान्स करताना दिसली. आलिया या सिनेमात पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. आलियाची टायगर सोबत स्क्रिन शेअर करण्याची पहिलीच वेळ होती. ती या गाण्यात खूपच हॉट अवतारात दिसली. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा येणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळींच्या ‘इन्शाअल्लाह’मध्ये ती सलमान खान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Comment