सलमान सोबतचे दीपिकाने नाकारलेले ‘हे’ चित्रपट झाले सुपरहिट


आतापर्यंत सर्व प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोणने काम केले आहे. पण याला सलमान खान अपवाद आहे. दीपिकाने आपल्या जवळपास 10 वर्षांच्या करिअरमध्ये अद्याप सलमान सोबत कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. दीपिकाने एक-दोन नाही तर तब्बल 5 वेळा सलमान सोबत काम करण्याची संधी घालवली. आतापर्यंत सलमानचे 5 चित्रपट तिने नाकारले. आज आम्ही तुम्हाला त्याच चित्रपटांची माहिती देणार आहोत. चला मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट…

दीपिकाला दिग्दर्शक अली अब्बास जफर याच्या ‘सुलतान’ या चित्रपटाची सुरुवातीला ऑफर करण्यात आली होते. पण दीपिकाने या चित्रपटाला शूटिंगच्या तारखांचा ताळमेळ बसत नसल्याने नकार दिला आणि त्यानंतर अनुष्काला या चित्रपटात दीपिकाच्या जागी घेण्यात आले.

सलमानच्या ब्लॉकबास्टर चित्रपटांपैकी ‘प्रेम रतन धन पायो’ हा एक चित्रपट आहे. सलमानने या चित्रपटात सोनम कपूरसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. मात्र सोनमने साकारलेल्या राजकुमारी मैथिलीच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. पण यासाठी दीपिकाने नकार दिला पण तिने कधीच यामागचे कारण सांगितले नाही.

बॉक्स ऑफिसवर सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या ‘किक’ या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. दीपिकाला याचित्रपटातील आयटम साँगसाठी विचारण्यात आले होते पण तिने नकार दिल्यानंतर हे गाणे नर्गिस फखारीच्या पदरात पडले.

दीपिकाला सलमानच्या आणखी एक ब्लॉकबास्टर असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली होती. पण तिने हा चित्रपट सुद्धा नाकारला आणि त्यानंतर तिच्या जागी करिना कपूरला या चित्रपटात कास्ट करण्यात आले. दीपिकाने यावेळी डेट्स नसल्याचे कारण देत या चित्रपटाला नकार दिला होता.

अभिनेत्री डेझी शहाने सलमानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण या चित्रपटासाठी तिच्या अगोदर दीपिकाची निवड करण्यात आली होती. पण या चित्रपटाला तिने नकार दिला आणि विशेष म्हणजे दीपिकाने नाकारलेले हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले.

Leave a Comment