व्हॉट्सअॅपमुळे फोन स्टोअरेज संपू नये म्हणून सेंटिंगमध्ये करा ‘हे’ बदल


व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याकडून सर्वात जास्त मीडिया फाइल्स शेअर केल्या जातात. फोनचे स्टोअरेज फोटो, व्हिडिओ आणि ऑडियो स्वरूपातील या फाइल्समुळे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अशात तुम्ही जर ऑटोमॅटीक डाउनलोड ऑप्शन सुरु ठेवले असेल, तर तुमच्या फोनची मेमरी लगेच फूल होते. अशावेळेस काय करायला हवे याच्या काही टिप्स तुम्हाला आज आम्ही देणार आहोत.

तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणारी प्रत्येक मीडिया फाइल ऑटोमॅटिक डाउनलोड होत असेल तर ती तुमच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरते. तुम्हाला त्यासाठी सेटिंग्समध्ये काही म्यॅन्युअली बदल करावे लागतील. ज्यामुळे आलेल्या प्रत्येक मीडिया फाईलपैकी तुम्हाला नेमकी कोणती डाउनलोड करायची आहे हे ठरवता येते.

तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईलवर व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर ऑटोमॅटिक डाउनलोड बंद करण्यासाठी सर्वप्रथम ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Media auto-download’ वर क्लिक करा. त्यानंतर ‘When using mobile data’ वर क्लिक करा. त्यानंतर photos, audio आणि videos चे सर्व बॉक्स अनचेक करा यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड बंद होईल. Wi-Fi ऑन असताना आणि तुम्ही roaming मध्ये असतानासाठीसुद्धा यात ऑटोमॅटिक डाउनलोड करण्याचे ऑप्शन दिले आहे. ते सुद्धा तुम्हाला वरच्याप्रमाणेच बंद करता येईल.

तुम्ही जर iOS म्हणजेच iPhone वापरत असाल तर व्हॉट्सअॅपच्या Settings मध्ये जाऊन Data and Storage Usage वर क्लिक करा. त्यानंतर फोटो, व्हिडियो आणि ऑडियो या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक डाउनलोड करण्यासाठी Never या ऑप्शनवर क्लिक करा. यामुळे iOS मोबाईलवरील ऑटोमेटिक डाउनलोड डिसेबल होते आणि त्यामुळे तुमच्या iPhoneचे स्टोअरेजी बचत होते.

Leave a Comment