बिग बॉसच्या घरात जाणार लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ?


पुन्हा एकदा बिग बॉस मराठी सुरू होत असल्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात कोण कोणते स्पर्धक यावेळी असणार याची जोरदार चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर हेच करणार आहेत. दरम्यान या शोमध्ये दिग्गज स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यावेळीच्या पर्वात मराठी मालिका, नाटक आणि सिनेक्षेत्रासह अनेक क्षेत्रातील स्पर्धक दिसतील. राजकीय क्षेत्रातील लोकही यंदाच्या स्पर्धकांमध्ये सहभागी होणार का याची उत्सुकता आहे.

आता बिग बॉस मराठीचा दुसरा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यात एक लावणी नृत्यांगणा ढोलकीच्या तालावर नाचताना दिसत आहे. याचे कॅप्शनदेखील वेगळे आहे. कलर्स मराठीच्या या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, बॉस मराठी २च्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार? ही नृत्यांगणा दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे, लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकर. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सुरेखा पुणेकर येणार या गोष्टीला या प्रोमोमुळे दुजोरा मिळाला आहे. सुरेखा पुणेकर शोमध्ये आल्या तर बिग बॉसच्या घरात बरीच धमाल होऊ शकते याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही.

Leave a Comment