नवी दिल्ली – बीसीसीआयकडून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्ले ऑफ व अंतिम सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे सामने यापूर्वी रात्री ८ वाजता होणार होते, पण हे सामने आता संध्याकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या बाराव्या मोसमातील ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier-१ हा सामना चेन्नईत ७ मे रोजी खेळला जाईल. तर Eliminator सामना ८ मे रोजी आणि Qualifier-२ सामना १० मे रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
आयपीएलच्या प्ले ऑफ, अंतिम सामन्याच्या वेळा बीसीसीआयने बदलल्या
१२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हे सर्व सामने यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार होते. पण हे सामने आता अर्धा तास लवकर म्हणजेच, सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील.