केवळ मीच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतो – जानकर

mahadev-jankar
सांगली – केवळ मीच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. आम्ही त्याची सुरवात केली असल्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. याआधी ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा नव्हता. पण तो नरेंद्र मोदी यांनी मिळवून दिला, असे मतही मंत्री जानकर यांनी व्यक्त केले आहे.

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर सांगली दौऱ्यावर सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते. जानकर यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन धनगर आरक्षण बाबतीत भाजप आणि आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षण हे धनगर समाजाला मिळणार आहे आणि मीच हे आरक्षण मिळवून देणार आहे असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

केंद्र पातळीवर धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आहे. याबाबतचे प्रयत्न राज्य सरकारकडूनही सुरू आहेत. शिफारस करण्याबरोबरच टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण आग्रही आहोत. आदिवासींप्रमाणे धनगर समाजाला सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. फक्त राजकीय आरक्षण देणे बाकी असल्यामुळे धनगर आरक्षण देण्याची सुरवात आम्ही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपण करणार, असा विश्वासही मंत्री जानकार यांनी व्यक्त केला.

Leave a Comment