चिनी कंपन्यांसमोर अॅमेझॉनने टेकले गुडघे

amazon
मुंबई : आता चीनमधून आपला कारभार जगातली सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन बंद करणार आहे. चिनी आॅनलाइन कंपनींसमोर अॅमेझॉनने गुडघे टेकत आपली हार स्विकारली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की जुलैपासून चिनी मार्केटप्लस बिझनेस बंद होणार आहे. म्हणजे आता अ‍ॅमेझॉनवर चीनच्या स्थानिक विक्रेत्यांचे सामान विकले जाणार नाही. ग्राहकांना देशाबाहेरची उत्पादने आता अ‍ॅमेझॉनवर मिळतील. पण यामुळे अ‍ॅमेझॉनला मोठे नुकसान सहन करावे लागेल.

Alibaba अलिबाबा आणि JD.com यांचे चीनच्या ई कॉमर्स बाजारात नाव मोठे आहे. अ‍ॅमेझॉनला नवे अॅप Pinduoduo ही चांगलीच टक्कर देत आहे. म्हणूनच अ‍ॅमेझॉनला चीनमध्ये काम करणे कठीण झाले होते. चीनच्या ई कॉमर्समधून बाहेर पडणे म्हणजे अ‍ॅमेझॉनचे मोठे अपयश समजले जात आहे.

2004मध्ये अ‍ॅमेझॉनने चिनी आॅनलाइन बुक स्टोअर 520 कोटी रुपयांनी खरेदी केले होते आणि आपला कारभार सुरू केला होता. कंपनीने तेव्हापासून वेअरहाऊसेज आणि डाटा सेंटरमध्ये गुंतवणूक केली होती. चिनी विक्रेत्यांना कंपनीने आपले सामान अ‍ॅमेझॉनवर विकण्याचे ट्रेनिंगही दिले.

अ‍ॅमेझॉनने 2016मध्ये चीनमध्ये Prime Membership प्रोग्राम सुरू केला. उच्च प्रतीच्या पाश्चात्य वस्तू आणि मोफत आंतरराष्ट्रीय डिलिव्हरीसारख्या सुविधा ग्राहकांना आकर्षित करतील असे वाटले होते. पण ग्राहकांना प्राइम व्हिडिओसारखे जादा फायदे उपलब्ध झाले नाहीत.

Leave a Comment