दिल्लीच्या संघासोबत थिरकली शिखरची पत्नी, व्हिडीओ व्हायरल

shikhar-dhawan
दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या बाराव्या हंगामात चांगली सुरुवात केली असून दिल्लीचा संघ सध्या ५ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली डेअरडेविल्स नावाने अकराव्या हंगामापर्यंत मैदानात उतरणारा दिल्लीचा संघ, दिल्ली कॅपिटल्स नावाने बाराव्या हंगामात मैदानात उतरला. संघमालक आयपीएल सामन्यांनंतर खेळाडूंसाठी पार्टी आयोजित करत असतात. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनच्या बायकोने अशाच एका पार्टीमध्ये भांगड्यावर ठेका धरला.


सध्या सोशल मीडियावर शिखरची पत्नी आएशाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्द शिखर, इशांत शर्मा हे खेळाडू या व्हिडीओत आएशासोबत नाचताना दिसत आहेत.

Leave a Comment