घर बसल्या ही रद्द करता येते काऊंटरवर काढलेले रेल्वे तिकीट

IRCTC
मुंबई : प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC ) सुरू केल्या आहेत. रेल्वे काऊंटरवर बुक केलेले तिकीट यापूर्वी रद्द करण्यासाठी काऊंटरवर जावे लागत होते. पण आता घरी बसूनही तुम्ही ते तिकीट रद्द करू शकता. काऊंटर, स्टेशन, रिझर्व्हेशन ऑफिस, बुकिंग ऑफिस येथे बुक केलेले तिकीट रद्द करण्याची आयआरसीटीसीने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा तुम्हाला www.irctc.co.in या संकेतस्थळावर मिळेल.

यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर www.irctc.co.in तुम्ही लॉग इन करावे लागेल. त्यानंतर होमपेजवर ट्रेन ऑप्शनवर कर्सर आणा. आता कर्सरला ड्रॉप मेन्यूमध्ये कॅन्सल तिकिटावर आणा. आता काऊंटर तिकिटावर क्लिक करा. काऊंटर तिकिटावर क्लिक केल्यानंतर नवे पेज ओपन होईल. तिथे पीएनआर नंबर आणि ट्रेन नंबर लिहल्यानंतर कॅप्चा भरा. मग चेक बॉक्सला कन्फर्म करा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाइलवर OTP येईल. हा तोच नंबर जो बुकिंगच्या वेळी मिळालेला. मग सबमिटवर क्लिक करा.

OTP व्हॅलिड झाला की PNRचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील. पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पूर्ण कॅन्सलेशनसाठी कॅन्सल तिकिटावर क्लिक करा. त्यानंतर रिफंड अमाऊंट स्क्रीनवर दिसेल. युजरला एक SMS येईल. त्यात PNR आणि रिफंडची माहिती मिळेल. कॅन्सल तिकिटाचा रिफंड इंडियन रेल्वेच्या PRS काऊंटरवर तिकीट जमा केल्यावर मिळेल. रिफंड तुम्हाला नियमानुसारच मिळेल.

Leave a Comment