गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने आपला धडाकेबाज फॉर्म आयपीएलच्या बाराव्या हंगामात कायम राखला आहे. चेन्नईला आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये केवळ दोन पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईला मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद या संघांनी पराभवचा धक्का दिला आहे. चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत १४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
का बरे धोनीला भरवतो आहे केदार ?
चेन्नईच्या संघाची आयपीएलमध्ये चाहत्यांची सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला संघ म्हणून ओळख असून चेन्नईचे संघ व्यवस्थापन आणि खेळाडू या कारणासाठी सोशल मीडियावर नेहमी हजर असतात. सोशल मीडियावर चेन्नईच्या खेळाडूंनी केलेल्या प्रत्येक पोस्टला चाहते मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवतात. धोनीसोबतचा असाच एक व्हिडीओ चेन्नईच्या संघाचा महत्वाचा भाग असलेल्या केदार जाधवने शेअर केला आहे. केदारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जेवण भरवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनीही केदारने अपलोड केलेल्या या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान धोनीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतल्यामुळे संघाचे नेतृत्व सुरेश रैनाने केले. या सामन्यात हैदराबादने चेन्नईवर मात केली.