तुम्ही पाहिला आहे का रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचा ट्रेलर ?

kagar
वायाकॉम१८ स्टुडीओज आपल्या भेटीला ग्रामीण राजकारणाच वास्तवादी नवा चित्रपट घेऊन येत आहे. येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज – उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तब्बल तीन वर्षानंतर पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू रसिकांच्या भेटीला येत आहे.

रिंकू राजगुरू तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार किंवा जुना जाणार तेंव्हाच नवा येणार अशा आरोळ्या देत “कागर” च्या या प्रचारच्या रणधुमाळीत नव्या जोशात उतरली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाच्या टीझरला उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटाद्वारे शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. “कागर” २६ एप्रिलपासून रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Leave a Comment