विश्वचषकात खेळणार हा भारतीय संघ

team-india
मुंबई – पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेल्स येथे खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली.


कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होती. या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा यांना संधी देण्यात आली.

भारतीय संघ – शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा

भारतीय संघाचे सामने
बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिका
रविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंड
रविवार 16 जून 2019 : पाकिस्तान
शनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिज
रविवार 30 जून 2019: इंग्लंड
मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश
शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका

Leave a Comment