‘स्टूडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर रिलीज

student
वरुण, सिद्धार्थ आणि आलिया भट्ट या तिकडीच्या पदार्पणाचा चित्रपट असलेल्या स्टूडंट ऑफ द ईअरला मिळालेल्या तुफान यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘स्टूडंट ऑफ द ईअर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या भागात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या ट्रेलरमध्ये तिन्ही कलाकारांची खास झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तारा आणि अनन्याच्या या पदार्पणीय चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांनी केले आहे. तर हिरू जोहर आणि करण जोहर यांची निर्मिती आहे. मे महिन्याच्या १० तारखेला हो चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment