30 मे पर्यंत सादर करा देणगी व देणगीदारांची माहिती – सर्वोच्च न्यायालय

supreme-court
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणग्यांची माहिती देण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक आयोगाकडे ३० मे पर्यंत देणगी व देणगीदारांची माहिती सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

राजकीय पक्षांना देणगी देण्यासंदर्भातील इलेक्टोरल बाँडवर निर्बंध लावण्यात येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने सांगितले की इलेक्टोरल बाँडवर बंदी आणली जाणार नाही. मात्र, सर्व पक्षांना निवडणूक आयोगाकडे याची माहिती द्यावी लागणार आहे. दरम्यान, न्यायालयाला केंद्र सरकारने सांगितले होते की, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना इलेक्टोरल बाँडविषयी कोणताही आदेश न देण्याची विनंती केली होती.

Leave a Comment