तुम्ही ऐकले आहे का इंदुरीकर महाराजांचे लोकसभा स्पेशल कीर्तन

indurikar-maharaj
हभप इंदुरीकर महाराज देशमुख यांचे किर्तन सध्याच्या तरुणाईला देखील खुप आवडत आहे. त्यांचे युट्युबवरील व्हिडीओला लोकांची खुप पसंती देखील भेटते हे काही आपल्याला नव्याने सांगायला नको. नुकतेच त्यांचे लोकसभा निवडणूक स्पेशल कीर्तन व्हायरल झाले आहे. अनेकांना इंदुरीकर महाराज यांचे तिखट बोलणे झोंबते. पण इंदुरीकर यावर म्हणतात, माझे कीर्तन आजही सत्य आहे आणि उद्या देखील सत्य असेल. तुमच्या कानाला तो नक्की कडवट नक्की वाटेल. पण त्यात वास्तव असल्याचे इंदुरीकर म्हणतात. देशमुख असे इंदुरीकर महाराज यांचे आडनाव आहे. पण आज काल पाटील, स्वत:कडे हात दाखवत काही देशमुख देखील पैसे घेऊन मतदान घेतात, असे उपहासात्मक उदाहरण त्यांनी दिले. कीर्तन महाराज म्हणून माझे ऐकू नका, मुलगा आणि मित्र म्हणून ऐका, असे देखील इंदुरीकर यांनी यावेळी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले आहे. पण मतदान करण्यासाठी पैसे घेण्याची जी प्रवृत्ती वाढत चालली आहे, यावर इंदुरीकर महाराज यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनावर टीका देखील होते, तर दुसरीकडे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन मला आवडते असे म्हणणारा वर्ग देखील मोठा आहे. कमी मतदान देशात होते हे वाईट आहे, १०० टक्के मतदान करा आणि तुम्हाला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर नोटाचा पर्याय वापरा हा देखील सल्ला यावेळी इंदुरीकर यांनी दिला आहे.

Leave a Comment