निवडणूक आयोगाची ‘मोदी’ बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती

narendra-modi
निवडणूक आयोगाने ‘पीएम मोदी’ बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. हा चित्रपट निवडणुकांच्या काळात प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल, असे सांगत हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ११ एप्रिलला मोदींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता हे प्रदर्शन निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे लांबणीवर पडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. पण हा चित्रपट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झाल्यास तो आचासंहितेचा भंग असल्याचे सांगत विरोधकांनी आक्षेप घेतला होता केला होता. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळत हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपावला होता. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.

Leave a Comment