अल्पेश ठाकोरांनी सोडला काँग्रेसचा हाथ

alpesh-thakor
अहमदाबाद – गुजरातमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा झटका बसला आहे. गुजरातमधील काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर पक्षाची साथ सोडली आहे. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राधानपूर या मतदारसंघातून अल्पेश ठाकोर हे जिंकले होते. भाजपच्या लाविंगजी ठाकोर यांचा त्यांनी पराभव केला होता.

अल्पेश हे गुजरातमधील मागासवर्ग नेता असून त्यांची सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. गुजरातमध्ये जवळजवळ 50 टक्के मतदार मागासवर्गीय असल्यामुळे या वर्गाचा नेता कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाचा आहे. मागासवर्गावर गुजरात ओबीसी एकता मंचचे संयोजक अल्पेश ठाकोर यांचा प्रचंड प्रभाव आहे. राज्यात त्यांनी अंमली पदार्थांविरोधात लढा दिला आहे. दारूबंदीच्या बाजूचे ते असून पाटीदारांना आरक्षण देण्याचा अल्पेश यांनी विरोध केला. त्याला समांतर आंदोलनही उभे केले आहे.

Leave a Comment