सकाळी उठल्याबरोबर अशा प्रकारे करावे पाण्याचे सेवन

water
जपानी लोक दीर्घायुषी असतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहेच, पण त्याचसोबत या लोकांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या खुणा देखील पुष्कळ उशीरा दिसू लागतात. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असून, लठ्ठपणा जपानी लोकांमध्ये अभावानेच आढळतो. याचे श्रेय पुष्कळ अंशी या लोकांच्या आहारपद्धतीला दिले पाहिजे. जपानी लोकांच्या आहारामध्ये कोमट पाणी पिण्याला खूप महत्व आहे. सकाळी उठताबरोबर भरपूर कोमट पाणी पिण्याची प्रथा जपानमध्ये कैक शतकांपासून चालत आली आहे.
water1
सकाळी उठताबरोबर रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करण्याचे महत्व आहारतज्ञही सांगतात. तज्ञांच्या मते सकाळी उठताबरोबर कोमट पाण्याच्ये सेवन केल्याने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. ज्यांना वारंवार डोकेदुखी, अंगदुखी सतावते त्यांनी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी सेवन करावे. तसेच ज्यांचे हृदायचे ठोके जलद पडत असतील, ज्यांना एपिलेप्सी, म्हणजेच फिट्स येत असतील, ज्यांना दम्याचा किंवा श्वसनाशी संबंधित इतर विकार असतील अशांसाठीही सकाळी उठताबरोबर कोमट पाण्याचे सेवन लाभकारी ठरते. डोळ्यांचे विकार, पित्त, गर्भाशयाशी संबंधित काही विकार, मासिक पाळीशी निगडीत समस्या, कानाशी निगडित काही विकार, बद्धकोष्ठ, मळमळणे अशा तक्रारींसाठी देखील सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने फरक दिसून येतो.
water2
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन कशा प्रकारे केले जावे यासाठी देखील काही नियम सांगितले गेले आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी तीन ते चार ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे. त्यानंतर दात घासावेत. मात्र त्यानंतर पुढील पंचेचाळीस मिनिटे काहीही खाणे किंवा चहा-कॉफी पिणे टाळावे. दिवसातून इतर वेळी पाणी पिताना ही काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. भोजन झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे. भोजन करीत असताना पाणी पिणे टाळावे. ज्यांना सकाळी उठून तीन ते चार ग्लास पाणी पिणे शक्य नसेल, त्यांनी सुरुवातीला जमेल तेवढे पाणी पिण्याने सुरुवात करून दररोज थोडे थोडे पाण्याचे प्रमाण वाढवत जावे. तसेच भोजनाच्या आधी अर्धा तास भरपूर पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment