शरद पवारांच्या भेटीला सचिन तेंडुलकर

sachin-tendulkar
मुंबई : आज सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भेट घेतली. अद्याप या भेटीचे कारण समजू शकले नाही. सचिनने शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन भेट घेतली.

राज्यासह देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु असल्यामुळे विविध पक्षाचे राजकीय नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. एकीकडे ही स्थिती असताना शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन सचिन तेंडुलकरने भेट घेतल्याने, या भेटीचे अंदाज बांधणे सुरु झाले आहे. अद्याप या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. जवळपास अर्धा तास सचिन पवारांच्या घरी होता. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती देणे सचिनने टाळले.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. राज यांनी पवारांना पाडवा मेळाव्याचे आमंत्रण दिल्याचे या भेटीवेळी सांगण्यात येत आहे. पवार राज ठाकरेंच्या मंचावर जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Comment