नवी दिल्ली: हरियाणातील रेवाडी येथे राहणारे तेज बहादूर यादव जानेवारी 2017 मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाचा भांडाफोड करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. बीएसएफने त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केले होते.
मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार बीएसएफचा ‘तो’ जवान
आता तेच तेज बहादूर यादव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे तेज बहादूर यादव हे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मोदींना वाराणसी मतदारसंघात आव्हान देण्याच्या तयारीत तेज बहादूर यादव हे आहेत. तेज बहादूर यादव यांचा मोदींविरोधात अपक्ष लढून सैन्यदलात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा मानस आहे. त्यांनी त्याबाबत ट्विट केले आहे.
जयहिंद मैं सोच रहा हूं क्यों ना बनारस से चुनाव लड़ा जाए मोदी जी के खिलाफ निर्दलीय मैं किसी पार्टी की गुलामी तो कर नहीं सकता
— Tej Bahadur Yadav (@iTejbahadur) March 28, 2019
चांगले अन्न, जेवण जवानांना मिळत नाही. जवान उन, वारा, पावसात सतत उभा असतो, पण त्याची हेळसांड होते, असा दावा तेज बहादूर यादव यांनी केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत गेले होते.