धोनीला चिअरअप करत होती झिवा !

mahendra-singh
नवी दिल्ली: महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिट्ल्सचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सने 6 बाद 147 धावा केल्या होत्या. हे आव्हान धोनीच्या चेन्नईने 19.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेन्नईकडून शेन वॉटसनने 26 चेंडूत 44 तर सुरेश रैनाने 16 चेंडूत 30 धावा ठोकल्या. त्यामुळे चेन्नईल सोपा विजय मिळवता आला.


त्याआधी शिखर धवनने दिल्लीकडून 47 चेंडूत 51 धावा केल्याने, दिल्लीला रडत कढत 147 धावांचा टप्पा गाठला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी करणाऱ्या ऋषभ पंतला चेन्नईविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही. पंतने 13 चेंडूत 25 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने केवळ 1 षटकार आणि 2 चौकार मारले.

दरम्यान, धोनीची पत्नी आपल्या लेकीसह या सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीत होती. नेहमीप्रमाणे धोनीची लेक झिवाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी धोनी मैदानात होता, पापा पापा अशी धोनीची लेक ओरडत होती. झिवा आपल्या बापाला प्रोत्साहन देत होती. झिवा आई साक्षीच्या मांडीवर उभी राहून पापा पापा अशी मोठ्याने ओरडत होती.

Leave a Comment