
नवी दिल्ली- काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगीला गर्ल अर्थात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतील लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण या वृत्ताला उर्मिला मातो़ंडकरने अद्याप दुजोरा दिला नव्हता. अशातच आता उर्मिलाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
रंगीला गर्लचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश
काँग्रेसमध्ये उर्मिलाने प्रवेश केला असला तरी कोणत्या मतदारसंघातून तिला उमेदवारी दिली जाणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण ती उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत.
