दयाबेनची तारक मेहता… मध्ये वापसी!

disha-vakani
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील दयाबेन गेल्या अनेक महिन्यापासून गायब होती. पण या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी लवकरच या मालिकेत वापसी करणार असल्याची माहिती मालिकेचे लेखक शैलेश लोढा यांनी दिली. ते एका अवॉर्ड फंक्शनमध्ये म्हणाले, मालिकेत दिशा नक्की परतणार आहे. त्याचबरोबर शैलेश यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान दिशा परत येण्याची गोष्ट नक्की केली आहे.

स्पॉटबॉय या वेबसाईटने नुकतेच दिशा वाकानीला मालिकेत परत येण्यासाठी 30 दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त दिले आहे. दिशाने 30 दिवसांत चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार आहे.

जानेवारीत मीडियाशी बोलताना तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितले होते की, अद्याप दिशाचा करार रद्द करण्यात आलेला नाही. तसेच दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला दिशाच्या ऐवजी घेण्याचा अद्याप तरी आमचा काहीही विचार नाही. कार्यक्रमात परतणे हे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तिला परत यायचे असल्यास तिचे स्वागतच आहे.

Leave a Comment