Video : असे बनले मुळशी पॅटर्नचे खतरनाक गाणे

pravin-tarade
तडाखेबंद लेखणी आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले प्रविण तरडे हे नाव मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे खुपच चर्चेत आले होते. त्यांच्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या चित्रपटाप्रमाणेच यातील एका गाण्याने तरुणाईला भुरळ घातली होती. चित्रपटातील खतरनाक हे युट्यूबवर दोन कोटींहून अधिकवेळा पाहिले गेले. त्या पार्श्वभूमीवर प्रविण तरडे यांनी या गाण्याच्या आठवणीसंदर्भातील एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

जेव्हा या गाण्याचा जन्म संगीतकार नरेंद्र भिडेंच्या स्टुडिओत होत होता, तरडेंनी फेसबुकवर तेव्हाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत नरेंद्र भि़डे या गाण्याला चाल लावताना आणि तरडेसह स्टुडिओतील इतर व्यक्ती ते गाणे गाताना पाहायला मिळत आहेत. ‘खतरनाक’ या गाण्याला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज पूर्ण झाले आणि म्हणूनच नरेंद्र भिडेंच्या स्टुडिओत ज्या दिवशी गाण्याचा जन्म झाला त्या दिवसाची ही एक गोड आठवण, असे त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

Leave a Comment