
सातारा – आपल्या वक्तव्यांसाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले प्रसिद्ध असून ते आपल्या गाण्यांसाठी म्हणा अथवा कॉलर उडवण्यासाठी म्हणा ते नेहमीच आपल्या कृतीमुळे चर्चेत असतात. काल देखील उदयनराजे यांच्या या शैलीचा अनुभव रविवारी कराड येथे आयोजित महाआघाडीच्या जाहीरसभेतही आला. यावेळी विशेष म्हणजे उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांनीही दाद दिली.
अन् शरद पवार जेव्हा उदयनराजेंची कॉलर उडवता तेव्हा
उदयनराजे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुदकी भी नही सुनता’ असा डायलॉग मारला आणि आपली कॉलर उडवली. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे दिग्गज नेते त्यावेळी मंचावर उपस्थित होते. उदयनराजे कॉलर उडवून ‘ये अपनी स्टाइल है’, असे म्हणत शरद पवार यांच्या बाजूला जाऊन बसले. उदयनराजे यांचे त्यावेळी शरद पवार यांनी हसत स्वागत केले आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली. पवार यांनी यावरच न थांबता स्वत: उदयनराजेंची कॉलर उडवली आणि हस्तांदोलन केले. त्या दरम्यान सभागृहात एकच हशा पिकला. उदयनराजे ही शरद पवार यांनी केलेल्या कौतुकामुळे खूश झाल्याचे दिसले.
