‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ब्रँडेड घड्याळांचा शौक

watch
आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही लक्झरी घड्याळांच्या बाबतीत मागे नाहीत. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी रोलेक्सपासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळे वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रेटी ज्यांना ब्रँडेड घड्याळांचे एवढे वेड आहे की त्यांना त्याची किंमत महत्वाची वाटत नाही. आम्ही आज तुम्हाला अशाच काही सेलेब्रिटींची माहिती देणार आहोत, जे महागड्या घड्याळांचे शौकिन आहेत.
watch1
अभिनेता इमरान हाश्मीचे महागडी आणि ब्रँडेड घड्याळ वापरणाऱ्यांच्या यादीत नाव सर्वात अगोदर घेतले जाते. ब्रँडेड घड्याळांचे इमरानला भयंकर वेड आहे. अनेक ब्रँडेड घड्याळ त्यांच्याकडे आहेत. पण इमरानचा Audemars Piguet हा आवडता ब्रँड आहे. आतापर्यंत फक्त 32 पिस या घड्याळाचे बनले आहेत आणि हे घड्याळ भारतात फक्त इमरान हाश्मीकडे आहे. या घड्याळाची 2.1 कोटी रुपये एवढी किंमत आहे.
watch2
TAG heuer या घड्याळाच्या ब्रँडची बॉलिवूडचा किंग शाहरुख खान जाहीरात करतो. हा ब्रँडही शाहरुखमुळे फेमस झाला आहे. पण शाहरुखचा Rolex Cosmograph हा आवडता ब्रँड आहे. तो नेहमीच व्हाइट गोल्ड डाय असलेले Rolex Cosmograph वापरताना दिसतो. 12 लाख रुपये या घड्याळाची किंमत आहे.
watch3
महागड्या आणि ब्रँडेड घड्याळांची सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणही शौकीन आहे. दीपिकाचा Tissot हा आवडता ब्रँड आहे. ती नेहमी Tissotचे ‘क्लासिक प्रिंस डायमंड रोज गोल्ड वॉच’ वापरते. तिच्या या घड्याळाची किंमत 8 लाख रुपये आहे.
watch4
महागड्या घड्याळांचे ज्यूनिअर बच्चन अभिषेककडेही कलेक्शन आहे. तो Seamaster 300 omega master हे घड्याळ सध्या वापरतो. या घड्याळाची किंमत जवळपास साडेसात लाख रुपये आहे.

Leave a Comment