भाजपमध्ये प्रवेश करणार जया प्रदा?

jayaprada
लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. यातच अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार अमर सिंग आपले गॉडफादर असल्याचे जया प्रदा यांनी म्हटले होते. तसेच जरी मी त्यांना राखी बांधली तरी लोक चर्चा करणे थांबवणार नाहीत असेही त्या म्हणाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदार संघाच्या माजी खासदार असलेल्या जया प्रदा यांनी पक्षाने निलंबित केल्यानंतर अमर सिंग यांच्यासोबत राष्ट्रीय लोक मंच स्थापन केला होता. त्यांच्या आणि अमरसिंग यांच्या नात्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या.

2004 आणि 2009 मध्ये समाजवादी पार्टीकडून खासदार झालेल्या जयाप्रदा यांनी भाजप प्रवेश केल्यास त्यांना रामपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे समाजवादी पार्टी आजम खान यांना त्यांच्याविरोधात तिकीट देऊ शकते. आजम खान आणि जयाप्रदा यांच्यातील वाद नवा नाही. आजम खान यांच्या विरोधानंतरही 2009 मध्ये जयाप्रदा यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. तर आतापर्यंत 11 पैकी 9 वेळा आजम खान रामपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.

Leave a Comment