व्हायरल – विमानाचे सारथ्य केले मायलेकींने

pilot
मायलेकींनी एका डेल्टा फ्लाइटचे लॉस एंजेलिस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. आई आणि मुलगी अटलांटासाठी जाणाऱ्या विमानात पायलट होत्या. एकाच विमानात पायलट असणाऱ्या या मायलेकींचा फोटो व्हायरल होत आहे. दोघीही विमानाच्या डेकमध्ये बसलेल्या या फोटोत दिसत आहेत. विमानाची कॅप्टन आई वेंडी रेक्सन आहेत तर मुलगी फर्स्ट ऑफिसर आहे. विमानाचा प्रवासी जॉन आर वेट्रटनी याबाबत ट्वीट केले आहे. दोघींचा फोटो त्यानंतर व्हायरल झाला आहे. रेक्सनची बहिणसुद्धा पायलट आहे.

Leave a Comment