देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात

engineer
नवी दिल्ली – ‘एस्पायरिंग माइंड्स’ने देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आणले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेनुसार देशातील 80 टक्के इंजिनिअर हे बेरोजगार असून त्यामागे तंत्रज्ञानाचे कौशल्य नसणे हे इंजिनिअर्सच्या बेरोजगारीचे प्रमुख कारण असल्याचे ‘एस्पायरिंग माइंड्स’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

त्याचबरोबर एस्पायरिंग माइंड्सच्या अहवालात देशातील ३.८४ टक्के इंजिनिअर्संना तांत्रिक, भाषिक आणि विश्लेषणात्मक ज्ञान नसल्याचे सांगण्यात आले आहे. कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, मोबाईल डेव्हलपमेंटचे केवळ ३ टक्के इंजिनिअर्संना ज्ञान आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे सरासरी १.७ टक्के रोजगार निर्मिती झाली आहे. केवळ ३६ टक्के अभियंते हे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रकल्प पूर्ण करतात.

पुस्तकीस्वरुपात अभियांत्रिकेचे ज्ञान हे अधिक आहे. तर अभियांत्रिकीतील संकल्पानाचा उद्योगात काय वापर होतो, हे ६० टक्के प्राध्यापकांना माहीत नाही. एस्पायरिंग माईंडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि सहसंस्थापक वरुण अग्रवाल यांनी यामध्ये बदल करण्याची गरज व्यक्त केली. अमेरिका, चीनसह भारतामधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर हा अहवाल तयार करण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या तुलनेत चारपट कोडिंगची माहिती असते. असे असले तरी कोडिंगमध्ये भारतीय अभियंत्यांची क्षमता चीनच्या अभियंत्याहून अधिक असल्याचे आढळून आले आहे. ही क्षमता चीनच्या तिप्पट असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment