‘ईद’च्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आलियाचे दोन चित्रपट

alia-bhatt
सध्याच्या घडीला अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रियतेच्या सर्वोच्च यशोशिखरावर असून बॉक्स ऑफिसवर आलियाच्या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद मिळत असल्यामुळे तिच्याकडे सध्या बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. ती आगामी काळात बऱ्याच चित्रपटामध्ये झळकणार असून पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे आलियाच्या दोन्हीही चित्रपटांमध्ये चुरस निर्माण होणार आहे.

आलियाची अलिकडेच सलमान खानच्या ‘इनशाल्लाह’ चित्रपटात वर्णी लागली आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर ती एस.एस. राजामौलीच्या ट्रिपल आर (RRR) या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही चित्रपट पुढील वर्षी ‘ईद’च्या दिवशी प्रदर्शित होणार आहेत. सलमान खानने एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की त्याचा ‘इनशाल्लाह’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होईल.

Leave a Comment